किवी हे आरोग्यासाठी उपयुक्त फळ असून या फळातून पोटॅशियम, फोलेट, फायबर, व्हिटॅमिन सी, ई आणि के सारख्या अँटिऑक्सिडंट्स सारखे घटक असतात. किवीचे सेवन केल्याने तुम्ही हाय बीपी म्हणजेच उच्च रक्तदाब, ब्लड शुगर ( रक्तातील साखर आणि कोलेस्ट्रॉल सारख्या समस्यांचा त्रास आपल्याला होत नाही. दररोज किवी खाण्याचे काय फायदे होतात ते पाहुयात
मधुमेह नियंत्रित करते
किवीमध्ये फायबरचे प्रमाण चांगले असते जे रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यास उपयुक्त असते. किवी हे मधुमेहाच्या रुग्णांसाठी खूप चांगले फळ मानले जाते. सलाड किंवा ज्यूसच्या रूपात किवीचा आहारात समावेश करू शकता.
वजन कमी करण्यासाठी फायदेशीर
किवी हे कमी कॅलरी असलेले फळ आहे, यामुळे वजन कमी करण्यासाठी हे सर्वोत्तम फळ आहे. किवीमध्ये मोठ्या प्रमाणात फायबर देखील आढळते. याचे सेवन केल्याने तुमचे पोट दीर्घकाळ भरलेले राहते, त्यामुळे तुम्हाला लवकर भूक लागत नाही. नाश्ताच्या वेळी तुम्ही किवीचा आहारात समावेश करू शकतात.
मजबूत होते रोग प्रतिकारशक्ती
किवीमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते ज्यामुळे रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते. तसेच त्वचेतील कोलेजन वाढवण्यासही मदत होते. किवीचे सेवन केल्याने संसर्गजन्य आजारांपासून बचाव होतो. तसेच त्वचा मुलायम आणि चमकदार राहते.
दूर होते बद्धकोष्ठतेची समस्या
किवी हा आहारातील फायबरचा चांगला स्रोत आहे, ज्याच्या सेवनाने पचनशक्ती मजबूत राहते. जर तुम्हाला बद्धकोष्ठतेच्या समस्येचा वारंवार त्रास होत असेल, तर आहारात किवीचा समावेश करणे फायदेशीर ठरू शकते. याशिवाय पोटाशी संबंधित इतर समस्याही दूर होतात.
हृदय ठेवते निरोगी
फायबर व्यतिरिक्त पोटॅशियम सारखे अनेक अँटिऑक्सिडंट किवीमध्ये आढळतात. याचे सेवन केल्याने तुम्हाला उच्च रक्तदाब आणि उच्च कोलेस्ट्रॉल सारख्या समस्यांपासून सुटका होते. हृदयाशी संबंधित समस्यांपासून संरक्षण मिळते. तसेच किवी खाल्ल्याने तुमचे हृदय निरोगी राहते.
Discussion about this post