पूर्व मध्य रेल्वेने अप्रेंटिस पदांच्या 1832 जागांसाठी भरतीची अधिकृत अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 09 डिसेंबर 2023 आहे.
या भरतीमध्ये दानापूर विभागासाठी 675 पदे, धनबाद विभागासाठी 156 पदे, डीडीयू विभागासाठी 518 पदे, सोनपूर विभागासाठी 47 पदे, समस्तीपूर विभागासाठी 81 पदे, प्लांट डेपो/पंडित दीनदयाळ उपाध्यायसाठी 135 पदे, प्रशिक्षक पदासाठी 10 पदे रिक्त आहेत. फॅक्टरी/हरनौतसाठी, मेकॅनिकल फॅक्टरी/समस्तीपूरसाठी 110 पदे ठेवण्यात आली आहेत.
या पदांसाठी होणार भरती?
फिटर, वेल्डर, मेकॅनिक, सुतार, इलेक्ट्रीशियन, वायरमन, टर्नर, मशीनिस्ट, लोहार, प्रयोगशाळा सहाय्यक इत्यादी पदांवर नियुक्त्या केल्या जातील.
शैक्षणिक पात्रता: (i) 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण (ii) संबंधित ट्रेड मध्ये ITI (फिटर/वेल्डर/ मेकॅनिक (डिझेल)/ रेफ.& AC मेकॅनिक/फोर्जर & हीट ट्रीटर/कारपेंटर/ इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक/पेंटर (G)/ इलेक्ट्रिशियन/मशीनिस्ट/ग्राइंडर/टर्नर/ वायरमन/मेकॅनिक M.V/कारपेंटर/इलेक्ट्रॉनिक्स/मेकॅनिकल/लॅब असिस्टंट/ ब्लॅकस्मिथ)
अर्ज फी
सामान्य, ओबीसी आणि ईडब्ल्यूएस श्रेणीसाठी अर्ज शुल्क १०० रुपये ठेवण्यात आले आहे. तर अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, PWD आणि महिलांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. अधिकृत वेबसाइटला भेट देऊन उमेदवार अधिक माहिती तपासू शकतात.
वय श्रेणी
भरतीसाठी किमान वय 15 वर्षे आणि कमाल वय 24 वर्षे ठेवण्यात आले आहे. यामध्ये एससी आणि एसटीला कमाल वयोमर्यादेत ५ वर्षांची तर ओबीसींना ३ वर्षांची सूट देण्यात आली आहे. 1 नोव्हेंबर 2023 पासून वयाची गणना केली जाईल.
तुम्ही याप्रमाणे अर्ज करू शकता
– सर्व प्रथम अधिकृत वेबसाइटवर जा.
– यानंतर रिक्रूटमेंट लिंकवर क्लिक करा.
– वैयक्तिक तपशील प्रविष्ट करून वापरकर्ता आयडी आणि पासवर्ड तयार करा.
– यानंतर फॉर्म भरा आणि सबमिट करा.
आता फॉर्मची एक प्रत डाउनलोड करा आणि ती तुमच्याकडे ठेवा.
Discussion about this post