नाशिक : मुंबईतील घाटकोपर येथे महाकाय बॅनर कोसळून या दुर्घटनेत १४ जणांचा बळी गेला. मुंबईतील ही घटना ताजी असतानाच राजकीय सभेदरम्यानही डिजिटल बॅनर कोसळल्याची घटना घडली. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत आज नाशिक लोकसभा मतदारसंघातील सटाणा येथे जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. मात्र याच दरम्यान सोसाट्याचा वाऱ्यामुळे व्यासपीठावरील बॅनर कोसळले. मात्र तरीही पवारांनी आपलं भाषण सुरूच ठेवलं होतं.
महाविकास आघाडीच्या उमेदवार डॉ. शोभाताई बच्छाव यांच्या प्रचारार्थ शरद पवार यांची सटाणा सभा घेतली. शरद पवारांच्या सटाणामधील सभेत भाषण सुरू असताना बॅनर कोसळल्याची दुर्घटना घडली. सटाण्यात शरद पवार यांचे भाषण सुरू असताना वादळी वारे सुटले होते, या वाऱ्यामुळे सभेच्या व्यासपीठावरील बॅनर कोसळत होता.
शरद पवार भाषण करत असलेल्या पाठिमागील बॅनर पडला. सुदैवाने या दुर्घटनेत कुणालाही जखम झाली नाही. व्यासपीठावर जे कार्यकर्ते होते, त्यांनी हा बॅनर वरचेवरच घेतल्याने अनर्थ टळला. मात्र, बॅनर कोसळल्याची घटना समजाच शरद पवारांनी आपले भाषण उरकते घेतले.
Discussion about this post