जळगाव : रस्त्याचे भूमिपूजन करुन जळगावकडे येत असलेल्या शिंदे गटाचे आमदार लता सोनवणे यांच्या कारला भरधाव डंपरने जोरदार धडक दिली. यामध्ये लता सोनवणे यांच्यासह त्यांचे पती माजी आमदार चंद्रकांत सोनवणे तसेच चालक, अंगरक्षकलाही किरकोळ दुखावत झाली.हा अपघात शनिवारी रात्री ८:४५ वाजता जळगाव तालुक्यातील करंज-धानोरा दरम्यान झाला.
शनिवारी संध्याकाळी सात वाजता कुरवेल ते तावसा या रस्त्याचे आमदार लता सोनवणे यांच्याहस्ते भूमिपूजन होते. तो कार्यक्रम आटोपून आमदार सोनवणे यांच्यासह त्यांचे पती चंद्रकांत सोनवणे हे वाहनातून (क्र.एम.एच. १९, बी.यू. ९९९) जळगावकडे येत होते. त्या वेळी चालकासह अंगरक्षकही वाहनात होते व मागे पोलिस स्कॉड होते. त्या वेळी डंपरने (एम.एच. १९, झेड – ६२४५) आमदार सोनवणे यांच्या वाहनाला जोरदार धडक दिली.
यामध्ये वाहनाचे मोठे नुकसान होऊन वाहनातील चारही जणांना दुखापत झाली. अपघात होताच जखमींना जळगावला हलविले व प्राथमिक उपचार करून घरी नेण्यात आले. दरम्यान अपघातानंतर डंपर चालक वाहन सोडून फरार झाला. घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती.
Discussion about this post