नाशिक । केंद्र सरकारने स्थानिक बाजारपेठांतील कांद्याचे दर नियंत्रणात आणण्यासाठी कांदा निर्यात बंदी केली. आता कांद्याच्या निर्णयाचा फटका द्राक्षाला बसत आहे. यामुळे द्राक्षाचे दर कोसळल्याने द्राक्षे उत्पादक शेतकरी अडचणीत आले आहेत. यामुळे द्राक्षाचे भाव कोसळले आहे.
कांदा निर्यातबंदी केल्याने बांगलादेशाने द्राक्षावर अतिरिक्त खर्च काढण्यासाठी शुल्क लावले आहे. बांगलादेशाने आयात होणाऱ्या द्राक्षांवर 103 रुपये आयात शुल्क लावले आहे. यामुळे भारतीय द्राक्षांचे बाजार भाव कोसळले आहेत. 40 ते 50 रुपये दराने विक्री होणाऱ्या द्राक्षांना आता 20 ते 25 रुपये दर मिळत आहेत. यामुळे द्राक्षांची पंढरी म्हणून ओळख असलेल्या नाशिक आणि सोलापूर जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादकांच्या चिंतेत वाढ झाली.
शेतकऱ्यांनी केली ही मागणी
निफाड तालुक्यातील नैताळे येथील द्राक्ष उत्पादक शेतकरी राजेंद्र बोरगुडे यांनी 30 एकरावर द्राक्ष बागेची लागवड केली. एकरी 2 लाख रुपये खर्च केला. आता मिळणाऱ्या बाजार भावातून उत्पादन खर्च निघणे अवघड झाला आहे. यामुळे केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यातबंदी हटवावी, तसेच बांगलादेशेतील आयात शुल्क दर रद्द करण्यासाठी हस्ताक्षेप करावा अशी मागणी द्राक्ष उत्पादक शेतकरी राजेंद्र बोरगुडे यांनी केली आहे.















Discussion about this post