संरक्षण संशोधन आणि विकास संघटना म्हणजेच डीआरडीओमध्ये अप्रेंटिस पदासाठी भरती जाहीर केली आहे. २० पदांसाठी ही भरती होणार असून नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत. अप्रेंटिस पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १४ ऑगस्ट २०२५ आहे. या नोकरीबाबत सविस्तर माहिती drdo.gov.in या वेबसाइटवर देण्यात आली आहे.
पात्रता
डिप्लोमा अप्रेंटिसशिपसाठी अर्ज करताना उमेदवारांना मान्यताप्राप्त विद्यापीठातून अंभियांत्रिकी किंवा टेक्नोलॉजीमध्ये डिप्लोमा केलेला असावा. आयटीआय अप्रेंटिसशिप पदासाठी उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून वोकेशनल कोर्ससाठीचे प्रमाणपत्र प्राप्त केलेले असावी.
अप्रेंटिस पदासाठी १८ ते २७ वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात.ही अप्रेंटिसशिप १ वर्षासाठी असणार आहे. या नोकरीसाठी उमेदवारांची निवड शैक्षणिक पात्रता आणि कागदपत्र पडताळणीच्या आधारे केली जाणार आहे.
स्टायपेंड
डीआरडीओमधील अप्रेंटिसशिप पदासाठी निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना ८००० रुपये स्टायपेंड दिली जाईल. आयटीआय अप्रेंटिसशिप पदासाठी ७००० रुपये स्टायपेंड दिली जाईल.
आवश्यक कागदपत्रे
अप्रेंटिसशिप पदासाठी अर्ज करताना उमेदवाराकडे १०वी, १२वीचे प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे. याचसोबत डिप्लोमा किंवा आयटीआर प्रमाणपत्र, फोटो, पोलिस व्हेरिफिकेशन सर्टिफिकेट, वैद्यकीय सर्टिफिकेट असणे गरजेचे आहे.
सरकारी कंपनीत काम करण्याची संधी तुम्हाला मिळणार आहे. यामुळे तुम्हाला भविष्यात करिअरच्या दृष्टीने खूप फायदे होणार आहे. या नोकरीसाठी तुम्हाला लवकरात लवकर अर्ज करायचे आहेत.
Discussion about this post