सरकारी कंपनीत इंटर्नशिप करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संघटन (DRDO) डिफेन्स इलेक्ट्रॉनिक्स रिसर्च लॅबोरेटरी लवकरच इंटर्नशिप योजना सुरु करणार आहे. या इंटर्नशिपसाठी तुम्ही अर्ज करु शकतात. या इंटर्नशिपसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १० जुलै २०२५ आहे.
डिफेन्स इलेक्ट्रॉनिक्स रिसर्च लॅबोरेटरीमधील या इंटर्नशिपसाठी अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. या इंटर्नशिपमध्ये ३ वेवगेळ्या पदांसाठी भरती केली जाणार आहे. इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन (ECE), कॉम्प्युटर सायन्स, मेकॅनिकल इंजिनियरिंग अशा तीन पदांसाठी ही भरती केली जाणार आहे.७५ पदांसाठी ही भरती केली जाणार आहे.
डीआरडीओमधील ही इंटर्नशिप पेड असणार आहे. या इंटर्नशिपसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून बीई/बीटेक अंतिम वर्षाचे उमेदवार अर्ज करु शकतात. यासाठी अर्ज करताना उमेदवारांना ज्या विषयात इंटर्नशिप करायची आहे ते नमूद करायचे आहे.
डीआरडीओमधील इंटर्नशिपचा कालावधी ६ महिन्यांचा असेल. या काळात तुम्हाला स्टायपेंड मिळणार आहे. पहिले तीन महिने पूर्ण झाल्यानंतर १५००० रुपये स्टायपेंड मिळेल. यानंतर इंटर्नशिप कालावधी पूर्ण झाल्यानंतर पैसे दिले जाईल. इंटर्नशिप पूर्ण झाल्यानंतरच तुम्हाला स्टायपेंड आणि सर्टिफिकेट मिळणार आहे.
या इंटर्नशिपसाठी उमेदवारांची निवड ३ वर्षांच्या पदवी अभ्यासक्रमाच्या टक्केवारीनुसार केली जाईल. तसेच वयोमर्यादा आणि पडताळणीनंतरच उमेदवारांची निवड केली जाईल.
अर्ज कसा करावा?
डीआरडीओ इंटर्नशिपसाठी अर्ज करताना उमेदवारांना www.drdo.gov.in/drdo/careers वेबसाइटवर जाऊन फॉर्म डाउनलोड करावा लागेल. त्यानंतर फॉर्म आणि कागदपत्रे hrdc.dlrl@gov.in वर मेल करावीत.
Discussion about this post