संरक्षण संशोधन आणि विकास संघटना म्हणजेच डीआरडीओमध्ये ज्युनिअर रिसर्च फेलोशिप पदांसाठी भरती जाहीर केली आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या नोकरीसाठी तुम्हाला कोणतीही परीक्षा द्यावी लागणार नाही. या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले जात आहे, या नोकरीसाठी तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. एकूण १२ जागा रिक्त आहेत. या नोकरीसाठी अर्ज करताना कोणतेही शुल्क भरण्याची गरज नाही.
डीआरडीओमध्ये रिसर्च फेलो पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने एमई/नेट / गेट याचसोबत एमएससी, बीई, बीटेक पदवी प्राप्त केलेली असावी. या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराची कमाल वयोमर्यादा २८ वर्षे असावी. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेनुसार सूट देण्यात आली आहे.
डीआरडीओमधील रिसर्च फेलोशिपमध्ये उमेदवारांची निवड इंटरव्ह्यूद्वारे केली जाणार आहे. या नोकरीसाठी निवड झाल्यावर उमेदवारांना ३७००० रुपये स्टायपेंडदेखील मिळणार आबे. याचसोबत प्रत्येक महिन्याला एचआरएदेखील मिळणार आहे. या नोकरीसाठी इंटरव्ह्यू ६ आणि ७ मेनंतर सुरु होणार आहे.
डीआरडीओमध्ये () रिसर्च फेलोशिप योजनेबाबत अधिकृत वेबसाइटवर अधिसूचना देण्यात आली आहे. अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट www.drdo.gov.in या वेबसाइटवर जायचे आहे. त्यानंतर फॉर्म डाउनलोड करुन तो भरायचा आहे. इंटरव्ह्यूला जाताना कागदपत्रे सोबत घेऊन जायची आहे.इंटरव्ह्यू डिफेंस जियोइंफॉर्मेटिक्स रिसर्च इस्टॅब्लिशमेंट हिम परिसर, प्लांट नंबर १०, सेक्टर ३७, ए चंदीगढ १६००३६ येथे होणार आहे.
Discussion about this post