दापोली, जि. रत्नागिरी – माजी महसूल मंत्री तथा विधान परिषदेचे सदस्य एकनाथराव खडसे यांचे जेष्ठ बंधू आणि कोथळी (ता. मुक्ताईनगर) येथील रहिवासी डॉ. बारसु गणपतराव खडसे (वय ८५) यांचे दि. २५ सप्टेंबर २०२५ रोजी दुपारी १२.३० वाजता दापोली येथे वृद्धापकाळाने निधन झाले.
त्यांच्या इच्छेनुसार डॉ. खडसे यांचे पार्थिव दापोली होमिओपॅथिक वैद्यकीय महाविद्यालयात देहदान करण्यात येणार आहे. ते मुंबई व परिसर लेवा मित्र मंडळाचे माजी अध्यक्ष तसेच हाफकिन इन्स्टिट्यूट, परेलचे माजी संचालक होते. एक समर्पित शास्त्रज्ञ म्हणून त्यांनी संशोधन क्षेत्रात मोठे योगदान दिले असून अनेक विद्यार्थ्यांनी त्यांच्या मार्गदर्शनाखाली पीएच.डी. प्राप्त केली आहे.
त्यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण मुक्ताईनगर (जि. जळगाव) येथे झाले, तर महाविद्यालयीन शिक्षण छत्रपती संभाजीनगर येथे झाले. त्यांचे कार्य व मार्गदर्शन अनेकांच्या जीवनाला स्पर्शून गेले.
मृत्युसमयी त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली व एक मुलगा असा परिवार आहे.















Discussion about this post