मुंबई । आज एचडीएफसी, आयसीआयसीआय आणि अॅक्सिस बँकेसह काही बँकांच्या बँकिंग सेवा डाऊन झाल्याने ग्राहकांची डोखेदुखी वाढली आहे. यामुळे पैसे हस्तांतरीत करताना ग्राहकांना मोठी अडचण येत आहे. खिशात रोख नसल्याने त्यांची मोठी पंचाईत झाली आहे.
13 जुलै रोजी 13 तासांसाठी सेवा बंद करण्याची माहिती एचडीएफसी बँकेने अगोदरच दिली होती. एचडीएफसी बँकेची सेवा अपग्रेड करण्याचे काम सुरु असल्याने हा खंड पंडला आहे. या दरम्यान बँकिंग सेवा आणि युपीआय व्यवहार ठप्प होतील, असे बँकेने स्पष्ट केले होते. त्यामुळे 13 जुलै रोजी बँकिंग कामे होणार नाहीत, याची आगाऊ माहिती बँकेने दिली होती.
किती वाजेपर्यंत सेवा ठप्प
एचडीएफसी बँकेने शनिवारी 13 जुलै रोजी सिस्टम अपग्रेड करण्यासाठी बँकिंग आणि पेमेंट सेवा बंद ठेवण्याचे जाहीर केले होते. आज भल्या पहाटे 3 वाजल्यापासून ते संध्याकाळी 4:30 वाजेपर्यंत बँकेच्या कामकाजावर प्रभाव पडणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते.बँकेने अगोदरच जाहीर केल्याप्रमाणे या 13 तासांत ग्राहकांना युपीआय व्यवहार करता येणार नाही. तर बँकिंग आणि मोबाईल बँकिंगच्या काही सुविधा या अंशतः उपलब्ध असतील. या कालावधीनंतर सर्व सेवा सुरळीत होतील, असे बँकेने स्पष्ट केले आहे.
युपीआय सेवेवर परिणाम
बँकेच्या माहितीनुसार, ग्राहकांना भल्या पहाटे 3:45 ते 9:30 वाजेदरम्यान, दुपारी 12:45 वाजेनंतर युपीआयद्वारे व्यवहार करता येईल. शिल्लक रक्कमेची माहिती, पिन बदलण्याची सुविधा उपलब्ध होईल. सकाळी 3:45 ते 9:30 वाजेदरम्यान, 9:30 ते 12:45 वाजेदरम्यान ग्राहकांना ही सुविधा उपलब्ध नसेल. IMPS, NEFT, RTGS, HDFC बँक खात्यांतून रक्कम हस्तांतरण, ऑनलाईन ट्रान्सफर, ब्रँच ट्रान्सफर ही सुविधा उपलब्ध असेल.
Discussion about this post