भुसावळ । भुसावळ शहरात एक हादरवून सोडणारी घटना समोर आलीय. शहरातील वांजोळा रोड भागात दुहेरी खूनाची घटना उघडकीस आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. यात रेल्वे कर्मचाऱ्याने आपल्या पत्नीसह वयोवृध्द आईची हत्या केली असून, त्याचा शालक या घटनेत गंभीर जखमी झाला आहे. याबाबत पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
याबाबत अधिक असे की, भुसावळ शहरातील वांजोळा रोडवरील शगुन इस्टेट येथील रहिवासी हेमंत कुमार भूषण हा रेल्वेत नोकरीला आहे. पाच महिन्यांपूर्वीच लग्न करून आणलेली पत्नी आवडत नसल्याने त्यातून रेल्वे कर्मचारी असलेल्या पतीचे सातत्याने खटके उडत होते. यातूनच दाम्पत्यात कडाक्याचे भांडण झाले व आरोपी हेमंत कुमार भूषण याने आईचा व नंतर संतापात पत्नीचीदेखील आरोपी पतीने खून केला.
आई सुशीलादेवी ( वय वर्षे ६०) आणि पत्नी आराध्य हेमंत कुमार भूषण ( वय २४) असं मृतांची नाव असून या घटनेने त्याच्या घरी आलेल्या शालकाने त्याला आवरण्याचा प्रयत्न केला असता, त्याच्यावर देखील प्राणघातक हल्ला केला असून यात तो गंभीर जखमी झाला आहे. त्याला उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान, या कृत्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. .घटनास्थळी डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे, बाजारपेठ ठाण्याचे निरीक्षक राहुल गायकवाड,सपोनि मंगेश गोंटला, हरिष भोये पोहचले असून चौकशीची चक्रे फिरवण्यास प्रारंभ करण्यात आला आहे. या प्रकरणातील आरोपी हेमंत कुमार भूषण याला पोलिसांनी अटक केल्याचे वृत्त आहे.
Discussion about this post