अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष निवडणुकीची लगीनघाई सुरु असतानाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. माजी राष्ट्राध्यक्ष आणि रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला. अमेरिकेच्या पेंस्विल्वेनियामधील प्रचार रॅलीत डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर गोळीबार झाला असून गोळीबाराच्या घटनेत ट्रम्प थोडक्यात बचावले आहेत. गोळी त्यांच्या कानाला स्पर्श करून गेल्यामुळे
सध्या डोनाल्ड ट्रम्प यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे सांगण्यात येत आहे. या थरारक घटनेचा व्हिडीओ देखील समोर आला आहे. जेव्हा ट्रम्प यांना मंचावरून खाली आणले जात होते. तेव्हा त्यांच्या कानामागून रक्त येत असल्याचं दिसून आलं.
#WATCH | Gunfire at Donald Trump's rally in Butler, Pennsylvania (USA). He was escorted to a vehicle by the US Secret Service
"The former President is safe and further information will be released when available' says the US Secret Service.
(Source – Reuters) pic.twitter.com/289Z7ZzxpX
— ANI (@ANI) July 13, 2024
अमेरिकेत सध्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प नव्या जोमाने मैदानात उतरले आहेत. शनिवारी पेनसिल्व्हेनियातील बटलर येथे डोनाल्ड ट्रम्प एका प्रचार रॅलीला संबोधित करत होते. या रॅलीला हजारो अमेरिकन नागरिकांची उपस्थिती होती.
त्याचवेळी अचानक गोळीबाराचा आवाज झाला. यानंतर मोठी आरडाओरड सुरू झाली. सुरक्षा रक्षकांनी डोनाल्ड ट्रम्प यांना तातडीने सुरक्षास्थळी नेले. त्यावेळी एकच गडबड उडाली. लोक इकडून तिकडे पळाले. काही जण जमिनीवर झोपले. या रॅलीचा व्हिडिओ समोर आला आहे. त्याचवेळी परिसर गोळ्यांच्या आवाजांनी भरुन गेला. ट्रम्प यांनी त्यांच्या कानाला हात लावला. त्यावेळी रक्त वाहत होते. पोडियमच्या मागे त्यांना आश्रय घेतला. ट्रम्प यांच्यावर झालेल्या गोळीबाराच्या या घटनेनंतर अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी निषेश व्यक्त केला आहे.
Discussion about this post