मुंबई । गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या दरात सातत्याने वाढ होताना दिसत असून यामुळे दोन्ही धातूंनी विक्रमी पातळी गाठली. परंतु आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण झाली आहे.
दिवाळीपूर्वी आनंदाची बातमी समोर आली आहे. सराफा बाजारात आज २४ कॅरेट सोन्याचा भाव ५३१ रुपयांनी घसरून ७८,१६१ रुपये प्रति १० ग्रॅम झाला आहे. सराफा बाजारात चांदीचा भाव १४४२ रुपयांनी घसरून ९७४२० रुपये प्रति किलो झाला आहे.
सोने आणि चांदीचे हे दर आयबीजेएने जाहीर केले आहेत. यावर जीएसटी आणि ज्वेलरी मेकिंग चार्जेसचा समावेश नाहीत. आपल्या शहरातील सोन्या-चांदीच्या दरात १००० ते २००० चा फरक असण्याची शक्यता आहे. यावर्षी सोनं १४८०९ रुपये प्रति १० ग्रॅमनं महागले आहे. आयबीजेएनुसार, १ जानेवारी २०२४ रोजी १० ग्रॅम सोन्याची किंमत जीएसटीशिवाय ६३३५२ रुपये होती. मात्र, या काळात चांदी ७३३९५ रुपयांवरून ९७४२० रुपये प्रति किलो झाली आहे. या कालावधीत त्यात २४०२५ रुपयांची वाढ झाली.
१४ ते २३ कॅरेट सोन्याचे दर
आज २३ कॅरेट सोन्याचा भाव ७७,८४८ रुपये प्रति १० ग्रॅम झाला. यामध्ये ५२८ रुपयांची घसरण झालीये. आज २२ कॅरेट सोन्याचा भाव ४८६ रुपयांनी कमी होऊन ७१,५९६ रुपये प्रति १० ग्रॅम झालाय. तर १८ कॅरेट सोन्याचा भाव आज ३९८ रुपयांनी कमी झाला असून तो ५८,६२१ रुपये प्रति १० ग्रॅम झाला. तर १४ कॅरेट सोन्याचा भाव ३११ रुपयांनी घसरून ४५७२४ रुपये प्रति १० ग्रॅम झाला आहे.
Discussion about this post