मुंबई : दिवाळीमध्ये सोने आणि चांदी दरात सुरु असलेली दरवाढ थांबण्याचे नाव घेत नाहीय. लक्ष्मी पूजनाच्या दिवशी देखील सोने दरात वाढ झाली आहे. आज 1 नोव्हेंबरला दिवाळीच्या दिवशी 24 कॅरेट सोन्याचा प्रति दहा ग्रॅम भाव 81 हजार रुपयांच्या पुढे गेला आहे. देशातील चांदीचा दरही या दिवसांत एक लाखाच्या पुढे गेला होता. मात्र आज चांदीच्या दरात थोडीशी घसरण दिसून आली.
मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सोन्याच्या किमती विक्रम मोडत आहेत. देशातील जवळपास सर्वच शहरांमध्ये 24 कॅरेट सोन्याचा भाव 81 हजार रुपयांच्या पुढे आहे. तर 22 कॅरेट सोन्याच्या दराबद्दल बोललो तर त्याची किंमत 74 हजार रुपयांच्या पुढे आहे.
सोन्याच्या दरात वाढ झाल्याने सणासुदीत सोनं खरेदी करणाऱ्यांच्या खिशाला फटका मोठा फटका बसत आहे. तसेच