जळगाव । दिवाळीचा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. घर, दुकानात आणि संस्थांमध्ये दिवाळीच्या साफसफाईची कामे सुरू आहेत. यातच दिवाळीची साफसफाई करणे एका बालमजुर मुलाच्या जिवावर बेतली आहे. फटाका विक्रेत्याच्या घराची साफसफाईसाठी पाठवलेल्या बालमजुराचा उघड्या विद्युत तारेवर पाय पडून जागीच मृत्यू झाला. ही घटना जळगाव शहरातील बोहरा बाजारात घडली. सुनील संजय चव्हाण (वय १६) असे मयताचे नाव आहे.
मूळ मन्यारखेडा-भुसावळ येथील रहिवासी सुनील हा शहरातील बोहरा गल्लीत बांधकामाच्या ठिकाणी आई-वडील व बहीण यांच्या सोबत वास्तव्याला आहे. संपूर्ण कुटुंबीय मोलमजुरी करत असल्याने सुनील हा मिळेल ते काम करून कुटुंबाला हातभार लावत होता.
बोहरा बाजारात राजकमल सिनेमाच्या रांगेत अग्रवाल फॅन्सी फटाके दुकानाचे मालक अनिल अग्रवाल यांनी सुनील आणि त्याचा मित्र सागर सुभाष शिंदे अशा दोघांना त्यांच्या गणेश कॉलनीतील घरी साफसफाई करण्यासाठी पाठवले होते. बुधवारी (ता.१) सकाळी सुनील आणि सागर हे देाघेही अग्रवाल यांच्या घरी साफसफाई करत असताना सुनीलचा पाय खाली पडलेल्या विद्युत तारेवर पडल्या.















Discussion about this post