चांद्रयान-3 मिशनसाठी आज महत्त्वाचा दिवस होता. तब्बल महिनाभर एकत्र राहिल्यानंतर चांद्रयान-3 च आज विभाजन झालं. इस्रोच्या वैज्ञानिकांनी यशस्वीरित्या लँडिंग मॉड्युलला प्रॉपल्शन मॉड्युलपासून वेगळं केलं. आता चांद्रयान-3 च्या विक्रम लँडरला चंद्राच्या पृष्ठभागावर उतरण्यासाठी शेवटचा 100 किलोमीटरचा प्रवास स्वतःच करावा लागेल.
त्याला त्याचे इंजिन म्हणजेच थ्रस्टर्स वापरून त्याचा वेग कमी करावा लागतो. तसेच उंची कमी करावी लागते. विक्रम लँडर 17 ऑगस्ट 2023 रोजी दुपारी त्याच्या प्रोपल्शन मॉड्यूलपासून वेगळे झाले.
आता 18 आणि 20 ऑगस्ट रोजी होणार्या डीऑर्बिटिंगद्वारे विक्रम लँडर 30 किलोमीटर पेरील्युन आणि 100 किलोमीटर अपोलून ऑर्बिटमध्ये ठेवले जाईल. पेरील्युन म्हणजे चंद्राच्या पृष्ठभागापासून कमी अंतर. अपोलून म्हणजे चंद्राच्या पृष्ठभागापासून अधिक अंतर. आतापर्यंतचा प्रवास प्रोपल्शन मॉड्यूलने पूर्ण केला आहे. यानंतर विक्रमला उरलेले अंतर स्वत: पार करावे लागेल.
चंद्रावर सॉफ्ट लँडिंग किती वाजता?
यशस्वी सेप्रेशननंतर आता आठवड्याभराने 23 ऑगस्टला चांद्रयान-3 च्या सॉफ्ट लँडिंगची योजना आहे. 23 ऑगस्टला संध्याकाळी 5 वाजून 45 मिनिटांनी सॉफ्ट लँडिंग होऊ शकतं. भारताच्या तिसऱ्या चांद्रयान 3 मोहिमेला 14 ऑगस्टला सुरुवात झाली होती. श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अवकाश केंद्रारुन चांद्रयान-3 ने यशस्वीरित्या अवकाश कक्षेत प्रवेश केला होता. त्यानंतर टप्प्याटप्प्याने चांद्रयान 3 चा कक्षा विस्तार करण्यात आला.
Discussion about this post