जळगाव । राष्ट्र व राज्य निर्मितीत युवकांची महत्त्वपूर्ण भूमिका असून राज्यातील अनेक युवक विविध सामाजिक कार्यात सक्रिय आहेत. युवकांमध्ये असलेल्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी तसेच त्यांच्या सामाजिक कार्याचा गौरव करण्यासाठी राज्य शासनाच्या युवा धोरणांतर्गत जिल्हा युवा पुरस्कार दिले जातात.
सन २०२५–२६ या वर्षासाठी जिल्ह्यातील एक युवक, एक युवती तसेच एक नोंदणीकृत संस्था यांना जिल्हा युवा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. या पुरस्कारांतर्गत युवक व युवती यांना प्रत्येकी रु. १० हजार रोख, तर नोंदणीकृत संस्थेला रु. ५० हजार रोख रक्कम तसेच गौरवपत्र व सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे.
जिल्हा युवा पुरस्कारासाठी युवक/युवती अथवा युवा विकासासाठी कार्य करणाऱ्या नोंदणीकृत संस्थांनी १ एप्रिल २०२३ ते ३१ मार्च २०२६ या कालावधीत केलेल्या कामगिरीचा विचार केला जाणार आहे. इच्छुकांनी आपले अर्ज दि. २ एप्रिल २०२६ पर्यंत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जळगाव येथे सादर करावेत.
अर्जाचा नमुना जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात तसेच http://sports.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त युवक, युवती व युवा विकासासाठी कार्य करणाऱ्या नोंदणीकृत संस्थांनी विहित नमुन्यात अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.















Discussion about this post