चाळीसगाव : केंद्र सरकारच्या आरोग्य वर्धिनी योजनेंतर्गत तक्रारदाराची जमीन भाड्याने धेवून त्यावर नियमित भाडे सुरू करण्यासाठी 50 हजारांची लाच स्वीकारताना तत्कालीन जिल्हा आरोग्य अधिकाऱ्याला एसीबीने आज दुपारी रंगेहात अटक केली. देवराम किसन लांडे (शशिकला नगर, चाळीसगाव) असं लाच घेणाऱ्या अधिकाऱ्याचे नाव असून या कारवाईने खळबळ उडाली आहे.
जळगाव जिल्ह्यातील तक्रारदाराने धुळे एसीबीकडे तक्रार नोंदवल्यानंतर लाच पडताळणी करण्यात आली. धुळे एसीबीचे डॅशिंग पोलीस उपअधीक्षक अभिषेक पाटील यांच्या नेतृत्वात सहकार्यांनी लाचखोर अधिकारी लांडे यास शशिकला नगरातील राहत्या घरातून बेड्या ठोकल्या.
Discussion about this post