मुंबई । दिशा सालियन प्रकरणाला नवे वळण लागले आहे. मालवण पोलिसांच्या क्लोजर रिपोर्टमधून दिशाने आत्महत्याच केल्याचं समोर आले आहे. वडिलांचे अफेअर, आर्थिक चणचणीतून दिशाने आत्महत्या केल्याचा रिपोर्ट पोलिसांनी नोंदवला आहे.
पाच वर्षानंतर राज्यात पुन्हा एकदा दिशा सालियान प्रकरण चर्चेत आलं आहे. दिशा सालियानच्या वडिलांनी या प्रकरणाच्या चौकशीसाठी उच्च न्यायालयात धाव घेतली असून त्यांनी ठाकरे गटाचे नेते आमदार आदित्य ठाकरे यांच्यावर आरोप केले आहेत. यातच आता दिशा सालियान प्रकरणात पोलिसांच्या रिपोर्टमधून आत्महत्यामागील कारण समोर आले.
प्रोजेक्टमध्ये झालेले नुकसान आणि वडिलांच्या अफेअरमुळे त्यांना वारंवार पैसे द्यावे लागत होते. याच सगळ्या गोष्टीमुळे दिशा तणावात होती, त्यातूनच तिने टोकाचे पाऊल उचलल्याच समोर आले. दिशाने याबाबत मित्रांना सांगितले होते. दिशाच्या मैत्रिणींचे जबाब पोलिसांनी नोंदवले आहेत, त्यामधून ही माहिती समोर आली आहे. पोलिसांनी ४ जून २०२१ रोजी या प्रकरणातील क्लोजर रिपोर्ट दिशाच्या वडिलांना दाखवला होता, असेही समजतेय. दिशाचा प्रियकर रोहन राय, तिचे मित्र, आई वडिलांचे नोंदवल्यानंतर मालवण पोलिसांनी क्लोजर रिपोर्ट तयार केला होता.
दरम्यान या प्रकरणी एप्रिल महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात हायकोर्टात या प्रकरणाची सुनावणी होणार आहे. कोर्ट काय निर्णय घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागलेय.















Discussion about this post