मुंबई । दिशा सालियन हत्येच्या प्रकरणात वडिलांनी आदित्य ठाकरे, किशोरी पेडणेकर यांच्यावर गंभीर आरोप करत हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. याचिकेत दिशाच्या मृत्यूआधी पार्टीत आदित्य ठाकरे आणि इतर उपस्थित होते, सामूहिक बलात्कार झाला असा दावा आहे. यावरुन भाजपचे नेते आक्रमक होण्याची शक्यता असताना अनपेक्षित राजकीय ताकद आदित्य ठाकरेंच्या पाठीशी उभी राहिली आहे.
अजितदादा गटाचे आमदार अमोल मिटकरी आणि शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी दिशा सालियन प्रकरणात नव्याने दाखल करण्यात आलेल्या याचिकेतील आरोपांमध्ये तथ्य नसल्याचे म्हटले आहे.
दिशा सालियान या प्रकरणात सीआयडीच्या तपासात काहीही राजकीय नेत्यांचा सहभाग नव्हता. मी आदित्य ठाकरे यांची पाठराखण करत नाही. जे तपासात समोर आलं ते सांगतोय, कोणाकडे काही पुरावे असतील तर द्यायला हवे होते. कोणाकडे काही पुरावे नाहीत म्हणून आदित्य ठाकरे यांना क्लिन चीट दिली. त्यावेळी महाविकास आघाडीचं सरकार होते. मात्र, मागचे तीन वर्ष तर आमचं सरकार होतं असे सांगत नितेश राणेंच्या आरोपांवर प्रश्न संजय गायकवाड यांनी उपस्थित केला. यावेळी त्यांनी नागपूर हिंसाचाराबाबत भाष्य केले. औरंगजेबचा विषय शासनासाठी संपला असला. तरी माझासारख्या असंख्य शिवभक्तांसाठी संपलेला नाही. भाजप संघ सोडून शिवभक्त आहेत. स्वराज्य निर्माणात भाजप संघाचा काही सहभाग नव्हता असं संजय गायकवाड म्हणाले
Discussion about this post