जळगाव | जळगाव ग्रामीण तालुक्यातील विशेष सहाय्य योजनेंतर्गत पात्र सर्व दिव्यांग लाभार्थ्यांनी शासन निर्णय दिनांक २० ऑगस्ट २०२५ नुसार आपले UDID कार्ड आधार कार्डशी संलग्न करणे बंधनकारक असल्याची माहिती तहसीलदार डॉ. शीतल राजपूत यांनी दिली आहे.
या योजनेंतर्गत ज्या लाभार्थ्यांनी अद्याप आवश्यक कागदपत्रे सादर केलेली नाहीत, त्यांनी आपले UDID कार्ड व प्रमाणपत्र, अद्यावत आधार कार्ड तसेच बँक पासबुक यासह २० फेब्रुवारी २०२६ पूर्वी संजय गांधी योजना शाखा, तहसील कार्यालय, जळगाव येथे कागदपत्रे सादर करून माहिती अद्यावत करून घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच ज्या लाभार्थ्यांच्या खात्यात ₹२५००/- अनुदान जमा झाले आहे, त्यांनी देखील अनिवार्यपणे कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे.
शासन निर्देशानुसार, ज्या लाभार्थ्यांनी कागदपत्रांची पडताळणी करून माहिती अद्यावत केली नाही, त्यांची माहिती अद्यावत केली जाणार नाही व संबंधित लाभाबाबत शासन निर्देशाप्रमाणे पुढील कार्यवाही करण्यात येईल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.















Discussion about this post