नवी दिल्ली । शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या आमदार अपात्रेच्या सुनावणीवरून सर्वोच्च न्यायालयाचे विधानसभा अध्यक्षांना पुन्हा झापले आहे. ३१ डिसेंबरपर्यंत सुनावणी करावी असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिलेत. एक प्रकारचा थेट अल्टिमेटमच सर्वोच्च न्यायालयानं आजच्या सुनावणीत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना दिला आहे.
विधानसभा अध्यक्षांना आम्ही अनेक संधी दिल्या आहेत. पुढच्या निवडणुका पर्यंत आम्ही हा गोंधळ सुरू ठेवू शकत नसल्याचं न्यायालयाने म्हटलंय. दरम्यान अध्यक्षांनी काल न्यायालयाकडे सुनावणीचं वेळापत्रक दिलं होत. विधानसभा अध्यक्षांनी २९ फेब्रुवारी पर्यंत वेळापत्रक दिलं होत. जानेवारीच्या पहिल्या आठव्यात सुनावणी घेऊ असं म्हटलं होतं.
परंतु सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना झटका देत त्यांचं वेळपत्रक फेटाळून लावलंय. निवडणुकांपर्यंत हा गोंधळ चालू ठेवता येणार नसल्याचं म्हणत न्यायालायने ३१ डिसेंबरपर्यंतची डेडलाईन विधानसभा अध्यक्षांना देण्यात आलीय. तर राष्ट्रवादी काँग्रेसमधील आमदार अपात्र प्रकरणात ३१ जानेवारीपर्यंत निर्णय घेण्याचे आदेश दिलेत. यामुळे शिवसेना आमदार अपात्रतेचा निर्णय याच वर्षी लागणार आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसचा निर्णय नवीन वर्षांत लागेल.