नाशिक । आगामी विधानसभा निवडणुकीचे वारे राज्यात वाहू लागले आहेत. महाविकास आघाडीमध्ये जागावाटपाचा फॉर्म्युला अद्याप निश्चित झालेला नाही. मात्र त्यापूर्वीच शिवसेना ठाकरे गटाकडून नाशिकमध्ये दोन उमेदवार जाहीर करण्यात आले आहे. यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
आज शिवसेना ठाकरे गटाची निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्वाची बैठक झाली. नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातून जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर यांनी निवडणूक लढविण्याचा निर्णय घेण्यात आला. तर नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघाची निवडणूक माजी आमदार वसंत गिते यांनी लढवण्याचा निर्णय घेण्यात आला.
नुकतेच राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिक दौरा केला होता. यात त्यांनी दिंडोरी विधानसभा मतदारसंघातून सुनील तटकरे नरहरी झिरवाळ यांच्या नावाची महायुतीच्या जागावाटपाआधीच घोषणा केली. यावरून महायुतीत तणाव झाल्याचे चित्र आहे. यापाठोपाठ महाविकास आघाडीकडून शिवसेना ठाकरे गटाने उमेदवारी जाहीर केल्याने महाविकास आघाडीत मिठाचा खडा पडणार का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.