नाशिक । नाशिकमधून अपघाताची दुर्देवी घटना समोर आली आहे. बोलेरो गाडी आणि दुचाकीची जोरदार धडक झाली असून अपघातात पाच जण ठार झाले आहेत. टायर फुटल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.
दिंडोरी रोडवर ढकांबेगावाजवळ ही अपघाताची घटना घडली. या अपघाताने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. घटनास्थळी दिंडोरी पोलीस दाखल झाले आहेत. मदतकार्य सुरु करण्यात आले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, आज (दि. 05) दुपारच्या सुमारास नाशिक-दिंडोरी मार्गावर बोलेरो कार आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला. ढकांबे गावाजवळ ही घटना घडली आहे. या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला असून काही जण गंभीर जखमी आहेत.
टायर फुटल्याने अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज
अपघात इतका भीषण होता की दुचाकी आणि बोलेरो गाडीचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे. टायर फुटल्यामुळे हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. घटनेची माहिती मिळताच दिंडोरी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलीस आणि स्थानिकांनी मदतकार्य सुरु केले आहे. स्थानिक नागरिकांच्या मदतीने जखमींना तत्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर मृतदेह नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयात हलवण्यात येत आहे.
Discussion about this post