धुळे । धुळ्यातून एक धक्कादायक घटना समोर आलीय. कौटुंबिक वादातून पत्नीची भर दिवसा गळा चिरून पतीनेच हत्या केल्याची धक्कादायक घटना धुळे शहरातील देवपूर परिसरात उघडकीस आली आहे. अनिता बैसाणे (वय 40) असं मयत महिलेचं नाव असून या घटनेची माहिती कळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पाेलिसांनी पतीला ताब्यात घेतले असून अधिक तपास सुरु आहे.
पाेलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनूसार हिरामण बैसाणे याने भर रस्त्यात दुपारच्या वेळी धारदार शास्त्राने पत्नी अनिता बैसाणे हिची गळा चिरुन हत्या केली. त्यानंतर ताे घटनास्थळावरुन पसार झाला होता.
या घटनेची माहिती मिळताच पश्चिम देवपूर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी तात्काळ घटनास्थळी तपास यंत्रणांसह दाखल झाले. पाेलिसांनी घटनेचा पंचनामा केला. दरम्यान पतीने एवढ्या टोकाची भूमिका का घेतली याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. तरी तपास यंत्रणांच्या माध्यमातून पश्चिम देवपूर पोलिस अधिक तपास करीत आहेत.















Discussion about this post