धुळे । गावातील मुलांना नोकरी का नाही देत असा सवाल करत काही तरुणांनी धुळ्यातील टोल नाक्यावर तुफान राडा करत तोडफोड केली. याप्रकरणी १२ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी धुळे पोलिसांकडून तपास सुरू आहे.
धुळे-सोलापूर महामार्गावरील बोरविहीर फाट्याजवळील टोल नाक्यावर धिंगाणा घातल्याप्रकरणी १२ जणांविरोधात तालुका पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत टोलनाका चालक सारांश भावसार यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार धुळे पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे. गावातील मुलं कामाला का लावून घेत नाही? या कारणावरून १० ते १२ जणांनी टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करीत दमदाटी केल्याची तक्रार करण्यात आली आहे.
तसंच तुम्ही यापुढे टोलनाका कसा चालविता, आम्ही टोलनाका चालू देणार नाही, अशी धमकी देत तरुणांनी दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला असल्याचे तक्रारीमध्ये म्हटले आहे. सोमवारी सायंकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास ही घटना घडली आहे.
या राड्यासंदर्भातील सीसीटीव्ही फुटेज समोर आले असून या सीसीटीव्ही फुटेच्या आधारे तालुका पोलिसांनी या सर्व गोंधळ घालणाऱ्यांच्या विरोधामध्ये तक्रार दाखल करून घेतली असून त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिस तपास करत आहेत.
Discussion about this post