धुळे । स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दिवाळीपूर्वी होणार आहे. मात्र त्याआधीच ठाकरेंच्या शिवसेनेला हादऱ्यावर हादरे बसत आहेत. धुळ्यामध्ये काँग्रेस पाठोपाठ आता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत देखील खिंडार पडल्याचे दिसून येत आहे. धुळ्यामधील पदाधिकारी आणि शेकडो शिलेदारांनी शिवसेनेचा राजीनामा दिला आहे. धुळ्यातील शिवसैनिक मुंबईमध्ये दाखल झाले असून आज भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. हा ठाकरेंच्या शिवसेनेसाठी मोठा धक्का मानला जात आहे.
धुळे शहर विधानसभा संघटक ललित माळी, आणि युवा सेना जिल्हाध्यक्ष हरीश माळी यांनी पक्षश्रेष्ठींकडे पक्षाचा राजीनामा सुपूर्द केला आहे. काँग्रेस पाठोपाठ आता धुळ्यातील ठाकरे गट शिवसेनेचे पदाधिकारी देखील मुंबईत आज होणाऱ्या भाजप पक्षप्रवेश सोहळ्यामध्ये भाजपमध्ये पक्षप्रवेश करणार आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीआधी धुळ्यात भाजपची ताकद वाढली आहे. आगामी निवडणुकीत भाजपला याचा फायदा होऊ शकतो.
भाजपची ताकद वाढली –
धुळ्यातील ठाकरे सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी देखील ठाकरेंच्या शिवसेनेला रामराम ठोकल्याने शिवसेनेत देखील धुळ्यात खिंडार पडले आहे. काँग्रेसचे माजी आमदार कुणाल पाटील यांच्यासोबतचा फोटो पोस्ट करत शिवसेनेतून मुक्त होण्याचे पत्रक केले ठाकरे सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी व्हायरल केले आहे. निवडणुकीच्या आधीच ठाकरेंची शिवसेनेला हा मोठा धक्का मानला जात आहे. ललित व हरीश माळी यांचं धुळे परिसरात मोठं राजकीय वजन असून, त्यांच्या प्रवेशामुळे भाजपची ताकद वाढणार आहे. या प्रवेशाचा थेट फायदा भाजपला आगामी निवडणुकांमध्ये होण्याची शक्यता आहे. माळी यांच्यासोबत शिवसेनेचे शेकडो कार्यकर्ते भाजपमध्ये आज सामील होणार आहेत.















Discussion about this post