धुळे : पान टपरी धारकाकडून लाच घेणे धुळ्याच्या डी बी पथकातील पोलीस कॉन्स्टेबलला भोवले आहे. पंटरद्वारे संबंधित पोलीस कॉन्स्टेबलने लाच स्वीकारत असताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने (ACB) रंगेहात अटक केली. अझरुददीन शेख असे लाचखोर पोलीस कॉन्स्टेबलचे नाव असून या कारवाईने पोलीस प्रशासनात खळबळ उडाली आहे.
धुळ्याच्या आझादनगर पोलीस स्टेशन येथील डी.बी. पथकातील पोलीस कॉन्स्टेबल अझरुददीन शेख यांनी तक्रारदार असलेल्या पानटपरी चालकाकडून ३० हजार रुपयांची मागणी केली होती. मात्र एवढी मोठी रक्कम देता येणे शक्य नव्हती. तरी देखील यापुर्वी १७ हजार रुपये स्विकारुन होते. यानंतर तडजोडी अंती उर्वरित १२ हजाराची रक्कम घ्यायचे बाकी होते. या दरम्यान तक्रारदाराने धुळे एसीबीकडे तक्रार दिली. याची पडताळणी करून एसीबीने सापळा रचला.
पोलीस कॉन्स्टेबल अझरुद्दीन शेख यांनी उर्वरित १२ हजार रुपयांची रक्कम पंटर अब्दुल बासित अन्सारी याला स्वीकारण्यास सांगितले. अब्दूलने रक्कम स्विकारतांना त्यांना रंगेहात पकडण्यात आले असून, या दोघां विरोधामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Discussion about this post