धुळे । धुळे जिल्हा उद्योग केंद्रातील खादी ग्रामोद्योग प्रशासकीय अधिकारी कार्यालयात अधिकारी ऑन ड्युटी मद्यधुंद अवस्थेत असल्याचे आढळून आल्याने शिंदे गट शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी या नशेखोर अधिकाऱ्याचा सर्व प्रकार उघडकीस आणला. या अधिकाऱ्यांना पुढील कारवाईसाठी ताब्यात घेण्यात आले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, विजय चाटी हे धुळे जिल्ह्याचे ग्रामोद्योग अधिकारीपदी कार्यरत आहेत. मात्र ते कार्यालयात दारूच्या नशेत असतात अशी तक्रार आली असता शिवसेनेने त्याची दखल घेत मद्यधुंद असलेल्या विजय चाटी यांना जाब विचारला, मात्र ते दारूच्या नशीब असल्याने ते उत्तर देऊ शकले नाहीत, त्यांनी धुम्रपान देखील केलेले होते, त्यामुळे कार्यालय संपूर्ण घाण झाली असल्याचे दिसून आले आहे, या नशेखोर अधिकाऱ्यातर्फे महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला गुटखा व पानमसाला देखील नेहमीच सेवन केला जात असल्याचे दिसून आले आहे, अनेक नागरिक बेरोजगार या ठिकाणी कामानिमित्त येत असतात मात्र त्यांची काम होत नाही, असं असताना अधिकारी जर दारू पिऊन कार्य देत असतील तर हे खपवून घेतले जाणार नाही असं म्हणत शिवसेने शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
दारूसह महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेल्या गुटखा खाऊन कार्यालयात संबंधित अधिकारी सर्रासपणे सेवन करत असल्याचे देखील आले उघडकीस आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी माझे नातेवाईक असून भाजपचे पक्षश्रेष्ठी माझे सर्व निकटवर्तीय असल्याने माझे कोणीही काही करू शकत नसल्याचे मद्यधुंद अधिकाऱ्याने स्पष्ट केले.
Discussion about this post