धुळे : धुळे शहरातून मराठी शाळेचं धक्कादायक वास्तव समोर आले आहे. शहरात महापालिकेच्या असलेल्या ६५ मराठी शाळांपैकी तब्बल ४५ शाळा बंद झाल्या आहेत. तर उर्वरित सुरु असलेल्या २० शाळांपैकी १३ शाळा उर्दू माध्यमाच्या तर फक्त ७ शाळा मराठी माध्यमाच्या शाळा अस्तित्वात असल्याची माहिती समोर आली आहे.
सरकारकडून महापालिका, जिल्हा परिषदेच्या शाळा वाचविण्याचे वेगवेगळे प्रयत्न सुरु असताना धुळ्यात मात्र अनेक शाळा बंद पडल्या. दरम्यान स्पर्धेच्या युगात मुलांना दर्जेदार शिक्षण मिळावे. यासाठी बहुतांश पालक आपल्या मुलांना खासगी इंग्लिश मिडीयम शाळांमध्ये टाकत असतात. यामुळे पालिका व जिल्हा परिषद शाळांना विद्यार्थी मिळत नसल्याची स्थिती आहे. परिणामी शाळा बंद पडत आहेत.
एकेकाळी धुळ्यात खाजगी शाळांपेक्षा जास्त पटसंख्या या महापालिकेच्या मराठी माध्यमांच्या शाळेत असायची. मात्र आता परिस्थिती अवघड झाली आहे. धुळे शहरात खाजगी शाळांचा सुळसुळाट वाढला आहे. तर महापालिकेच्या गुणवत्ता आणि सोयी सुविधा बघता पालकांनी मुलांना खाजगी शाळेत शिकवण्याची पसंती दर्शविली आहे. गुणवत्ता नसल्याने विद्यार्थ्यांच्या संख्येत घट निर्माण होत आहे. यामुळेच मराठी माध्यमाच्या तब्बल ४५ शाळा बंद झाल्या. मात्र कुठल्याच लोकप्रतिनिधींना याबाबत काही एक घेणेदेणे नसल्याचे पाहण्यास मिळत आहे.















Discussion about this post