धुळे : जात प्रमाणपत्र काढून देण्यासाठी ३० हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या पंटरला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात अटक केल्याने खळबळ उडाली आहे.
धुळे लाचलुचपत विभागाच्या पथकाने सदरची कारवाई केली आहे. सदर प्रकरणात तक्रारदाराने घरातील दोन जात प्रमाणपत्र बनविण्यासाठी ऑनलाइन अर्ज केला होता. अर्ज करण्यास सहा महिने उलटल्यानंतर देखील अद्याप जात प्रमाणपत्र मिळाले नव्हते. यामुळे संबंधित तक्रारदाराने अधिकाऱ्यांला याबाबत विचारणा करण्यासाठी कार्यालय गाठले. मात्र संबंधित अधिकारी त्या ठिकाणी मिळून आले नाही.
तक्रादाराला येथे असलेल्या जात प्रमाणपत्र काढून देण्यासाठी असलेल्या पेंटरने गाठले. त्याने आपण जात प्रमाणपत्र काढून देऊ आणि संबंधित अधिकाऱ्यांशी आपले चांगले आहे; अशी बतावणी केली. याकरिता तक्रादाराकडे तीस हजार रुपये लाचेची मागणी केली. मात्र जात प्रमाणपत्र काढण्यासाठी इतकी मोठी रक्कम देता येणे शक्य नसल्याने संबंधित तक्रारदाराने या संदर्भात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांना या संदर्भातील माहिती दिली.
दरम्यान तक्रारीची पडताळणी केल्यानंतर धुळे लाचलुचपत विभागाच्या पथकाने सापळा रचला. यानंतर संबंधित पंटरने लाचेची रक्कम स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रुचून रंगेहात ताब्यात घेतले आहे, या संदर्भात लासलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने कारवाई करण्यात येत आहे.
Discussion about this post