धुळे । धुळ्यातील शिंदखेडा येथे महिला ग्रामसेविकेचा विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला असून यांनतर या महिलेने या अधिकाऱ्याच्या तोंडाला काळे फासून चोप दिल्याची घटना घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा पंचायत समितीमध्ये कार्यरत असलेल्या ग्राम विस्तार अधिकारी एस के सावकारे या ग्राम विस्तार अधिकाऱ्यातर्फे गेल्या काही दिवसांपासून सदर महिला कर्मचारीकडे शारीरिक सुखाची मागणी करत होता. या अधिकाऱ्याकडून महिलेचा सातत्याने विनयभंग केला जात होता. या घटनेमुळे या प्रकाराची तक्रार सदर पीडित महिलेने वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे केली. परंतु तक्रार करून देखील त्याची दखल घेतली जात नव्हती.
तक्रारीची दखल घेत नसल्याचे महिलेच्या लक्षात आल्यानंतर सदर महिला कर्मचारीने थेट कार्यालयातच जाऊन संबंधित ग्राम विस्तार अधिकाऱ्याला चांगलाच चोप दिला. तसेच त्या अधिकाऱ्याला तोंडाला काळे फासून जाब देखील विचारला. त्यामध्ये सदर महिला कर्मचारीने ठाकरे गट शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची देखील मदत घेतली. यावेळी महिलेसोबत ठाकरे गट शिवसेनेचे पदाधिकारी देखील होते. तेही संबंधित अधिकाऱ्याच्या कार्यालयात गेल्याचे दिसून आले आहे.















Discussion about this post