धुळे : धुळ्यात चोरटयांनी धुमाकूळ घातला आहे. यातच धुणीभांडी करणाऱ्या महिलेच्या घरात अज्ञात चोरट्यांनी हातसाफ केला. कपाटातील सोन्याच्या दागिन्यांसह एक लाख रुपये रोकड लंपास केली आहे. रात्री उकाडा वाटत असल्याने झोपण्यासाठी कुटुंबातील सर्व सदस्य घराच्या टेरेसवर झोपण्यासाठी गेले. यामुळे खाली घरात कोणी नसल्याची संधी साधून चोरी केली.
धुळे शहरातील बिलाडी रोड वरील सुगंधा आकर्षण सोसायटीत राहणाऱ्या उषाबाई गोविंद मेटकर यांच्या घरात रात्री चोरीची घटना घडली आहे. उषाबाई मेटकर या दुसऱ्यांच्या घरी धुणीभांडी करण्याच्या कामासाठी जात असतात. यातून मिळणारा पैसे जमवत दागिने केले होते. तर काही रोख रक्कम कपाटात ठेवली होती.
दरम्यान दोन दिवसांपासुन उकाड्यात वाढ झाल्याने रात्री अनेकजण गच्चीवर झोपण्यासाठी जात असतात. त्यानुसार उषाबाई या देखील घराचे कुलूप लावून वरती छतावर झोपायला गेले होते.
दरम्यान चोरट्याने रात्री घराचे कुलूप तोडून आतमध्ये प्रवेश केला. यानंतर कपाटातील एक लाख रुपयांच्या सोन्याच्या दागिन्यांसह एक लाख रुपये रोकड लंपास केली आहे. सकाळी कुटुंबीय खाली असता घरात चोरी झाल्याचे निदर्शनास आले. यानंतर घरात चोरी झाली असल्याची माहिती कुटुंबीयांना समजल्यानंतर कुटुंबीयांनी तात्काळ या घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर तात्काळ देवपूर पोलीस विविध तपास यंत्रणा सह घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून चोरट्यांचा पुढील तपास देवपूर पोलीस करीत आहेत.
Discussion about this post