धुळे : भारतीय सैन्यातून बडतर्फ केलेल्या धुळे जिल्ह्यातील मोहाडी येथील चंदू बाबुलाल चव्हाण याला नाशिक येथील देवळाली कॅम्प पोलीसांनी धुळे येथून ताब्यात घेतले आहे. तसेच देवळाली पोलीस स्टेशनात चंदू चव्हाण यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चंदू याने भारतीय सैन्याबाबत खोटी व बदनामी करणारा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रसारित केला होता. त्यामुळे त्याला अटक करण्यात आलीय
मोहाडी येथील चंदू बाबुलाल चव्हाण हे भारतीय सैन्य दलात कार्यरत होते. भारत- पाकिस्तान सीमेवर तैनात असताना भारताची सीमा क्रॉस करत पाकिस्तानात प्रवेश केला होता. त्यानंतर चंदू चव्हाण याना पाकिस्तानमध्ये अटक करण्यात आली होती. तीन महिने २१ दिवस पाकिस्तानच्या ताब्यात राहिल्यानंतर भारत सरकारने केलेल्या प्रयत्नानंतर पुन्हा मायदेशी परतले होते. यानंतर मात्र चंदू चव्हाण यांना सैन्य दलातून बडतर्फ करण्यात आले होते.
दरम्यान चंदू चव्हाण यांनी भारतीय सैन्याबाबत खोटी व बदनामीकारक व्हिडिओ पोस्ट केल्या आहेत. तसेच बडतर्फ सैनिकांना सैन्याचा गणवेश बंदी असतांना देखील सैन्याचा गणवेश घालून फिरणे यासह इतर बाबींमुळे देवळाली कॅम्प पोलीस स्टेशनात येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. यानंतर धुळे येथून आज चंदू चव्हाण यांना अटक करण्यात आली आहे.
Discussion about this post