धुळे । राज्यात अल्पवयीन मुलींसह महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या थांबता थांबत नसून अशातच धुळे जिल्ह्यातून काका-पुतणीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे. नराधम चुलत्यानंच आपल्या 3 वर्षांच्या कोवळ्या पुतणीला वासनेची शिकार केलं आहे. या प्रकरणी नराधम चुलत्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलं आहे. सोनगीर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. या घटनेने धुळे शहर हादरलं आहे.
18 वर्षीय चुलत्याने आपल्या तीन वर्षीय पुतणीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आल्याने सर्वच स्तरातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.
धुळ्यातील सोनगीर गावात ही घटना घडली आहे याप्रकरणी सोनगीर पोलिसांनी मयूर बापू माळी या नराधमाच्या मुसक्या आवळत पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करत गजाआड केले आहे. घडलेल्या प्रकारामुळे सोनगीर सह संपूर्ण जिल्ह्यात संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहे. अत्याचार करणाऱ्या नराधमाला फाशीची शिक्षा देण्याची मागणी सामाजिक कार्यकर्त्या प्रभा परदेशी यांनी केली आहे.















Discussion about this post