धुळे : धुळे तालुका पोलिसांनी कृषी पंप चोरी करणाऱ्या चोरट्याना ताब्यात आहे. या सोबतच चोरट्यांकडून कृषी पंप विकत घेणाऱ्याच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत.
धुळे तालुक्यातील धामणगाव शिवारामध्ये शेतकऱ्यांच्या शेतातून कृषी पंप चोरी गेल्याची तक्रार धुळे तालुका पोलीस ठाण्यात दाखल झालेली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने धुळे तालुका पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली. या तपासात चोरट्याबाबत माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे धुळे तालुका पोलिसांनी चोरट्याच्या मुसक्या आवळल्या. तसेच त्याने चोरी केलेले कृषी पंप ज्या इसमास विक्री केले होते. त्याला देखील पोलिसांनी ताब्यात घेतले.
चोरीचे पाच कृषी पंप जप्त
शेतकऱ्यांच्या शेतातून कृषी पंपाची चोरी करणाऱ्या चोरट्याला ताब्यात घेतले. त्याची चौकशी केली असता चोरट्याने जवळपास पाच कृषी पंप चोरल्याची कबुली दिली आहे. या चोरट्याकडून त्याने चोरलेले पाच कृषी पंप मोटर्स पोलिसांनी हस्तगत केले असून पुढील कारवाई धुळे तालुका पोलीस करीत आहेत.
Discussion about this post