धरणगाव । भरधाव ट्रकने कारला जोरदार धडक दिली. या धडकेत कारमधील आठ जण गंभीर जखमी झाल्याची घटना धरणगाव तालुक्यातील पिंप्री येथे घडली. दरम्यान, याबाबत धरणगाव पोलीस ठाण्यात ट्रक चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमकी घटना काय?
निर्मला करूणेश गुप्ता रा. भुसावळ या महिला आपल्या परिवारासह भुसावळ कडून पिंप्री मार्गे कार क्रमांक (एमएच १९ डीव्ही ८०९)ने मुंबई येथे जाण्यासाठी १३ जुलै रोजी सकाळी निघाले होते. पहाटे ४ वाजेच्या सुमारास पिंप्री गावानजीक त्यांनी कार रोडच्या बाजूला थांबविली होती. भरधाव ट्रक क्रमांक (एमएच ०४ ईवाय ९८३४) ने उभ्या असलेल्या कारला जोरदार धडक दिली. या अपघातात निर्माण्ला करूणेश गुप्ता, निखिलेश गुप्ता, रक्षा निखिलेश गुप्ता, अनिता शंकरलाल गुप्ता, शिलीनी मंगेश गुप्ता, मंगेश गुप्ता, अंशिका गुप्ता, तरूण शंकरलाल गुप्ता सर्व रा. भुसावळ हे जखमी झाले.
जखमींना धरणगाव ग्रामीण रूग्णालयात उपारार्थ दाखल करण्यात आले. याप्रकरणी सोमवारी १७ जुलै रोजी दुपारी ४ वाजता ट्रकवरील अज्ञात चालकाविरोधात धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ मोती पवार करीत आहे.
Discussion about this post