जळगाव । आगामी विधानसभा निवडणूक तोंडावर आली असताना धरणगाव तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामे दिले आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
सामूहिक राजीनामांमध्ये पदाधिकाऱ्यांनी असे नमूद केले आहे की, मंत्री अनिल पाटील, जिल्हा बँक चेअरमन व राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष संजय पवार यांनी लोकसभा निवडणुकीनंतर कार्यकर्त्यांची कोणत्याही समितीवर नियुक्ती नाही. तसेच कोणतेही काम होत नाहीत. त्यामुळे धरणगाव तालुक्यातील पदाधिकारी आपल्या निदर्शनास आणून देऊ इच्छितो की आपण शिवसेना भाजपा सोबत सत्तेत आहोत वर्ष उलटूनही कोणत्याही तालुक्याच्या कमिटीवर आपल्या कार्यकर्त्याची नियुक्ती होत नाही तसेच कोणतेही लोक हिताचे काम होत नसल्याने विनाकारण पदावर राहणे योग्य वाटत नाही.
ही बाब आम्ही आपल्या निदर्शनाशिअपूर्वी देखील आणून दिलेली आहे परंतु काही कार्यवाही होत नाही म्हणून आम्ही आमच्या पदाचे राजीनामे देत असून अजित दादांचे कार्यकर्ते म्हणून कायम काम करत राहू धन्यवाद आपले नम्र शामकांत पाटील तालुकाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस धरणगाव रमेश पाटील जिल्हा उपाध्यक्ष निंबाजीराव पाटील जिल्हा सरचिटणीस यांनी सामूहिक राजीनामा दिले आहे.
Discussion about this post