बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येचे फोटो समोर आल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. या प्रकरणात धनंजय मुंडेचे निकटवर्तीय वाल्मिक कराडचे नाव समोर आले आहे. त्यानंतर आता मंत्री धनंजय मुंडे मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे.
त्यांनी देशमुख यांच्या हत्येनंतर 82 दिवसानंतर मंत्रिपदाचा राजीनामा दिला. राजीनाम्याची प्रत मुख्यमंत्र्याकंडे सादर करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंडे यांचा राजीनामा स्विकारला आहे.
बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो काल सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. हे फोटो समोर आल्यानंतर राज्यात संतापाची लाट उसळली. या फोटोनंतर विरोधी पक्षांकडून धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. या प्रकरणाच्या सुरुवातीपासून विरोधकांकडून मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात होती. परंतु, त्यांनी सुरुवातीला राजीनामा देणे टाळले होते.
धनंजय मुंडे यांनी राजीनामा देण्यापूर्वी त्यांची देवगिरी बंगल्यावर सोमवारी रात्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि सुनील तटकरे यांच्यासोबत बैठक पार पडली होती. या बैठकीनंतर देवेंद्र फडणवीस यांनी धनंजय मुंडे यांना राजीनामा देण्यास सांगितल्याचे माहिती समोर आली होती.
Discussion about this post