भुसावळ धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्ताने प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने मुंबई – पुणे आणि नागपूर आणि नागपूर भुसावळ – नाशिक या मार्गावर ११, १२ व १३ रोजी विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. यात क्र. ०१०१७ ही विशेष गाडी ११ रोजी लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथून दुपारी दोन वाजता सुटेल आणि नागपूर येथे दुसऱ्या दिवशी सकाळी पाच वाजता पोहोचेल.
नागपूर लोकमान्य टिळक टर्मिनस क्र. ०१०१८ ही विशेष गाडी १३ रोजी नागपूर येथून मध्यरात्री १२:२० मिनीटांनी वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथे त्याच दिवशी सायंकाळी सात वाजता पोहोचेल. क्र. ०१२१८ विशेष गाडी नागपूर येथून १२ रोजी रात्री १०.०५ वाजता सटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथे दुसऱ्या दिवशी दुपारी २.३५ वाजता पोहोचेल.
या गाड्यांना सिंदी, सेवाग्राम (फक्त ०१२१८ साठी), वर्धा, पूलगाव, धामणगाव, चांदूर, बडनेरा, मूर्तिजापूर, अकोला, शेगाव, नांदुरा, मलकापूर, भुसावळ, जळगाव, पाचोरा, चाळीसगाव, मनमाड, नाशिक रोड, इगतपुरी, कल्याण आणि ठाणे येथे थांबे असतील.
नागपूर पुणे अनारक्षित गाडी क्र.०१२१५ ही १२ रोजी नागपूर येथून रात्री ११ वाजता सटेल आणि पुणे येथे दुसऱ्या दिवशी रात्री ८ वाजता पोहोचेल.
पुणे – नागपूर अतिजलद विशेष क्र. ०१२१६ विशेष गाडी पुणे येथून ११ रोजी दुपारी ४ वाजता सुटेल आणि नागपूर येथे दुसऱ्या दिवशी सकाळी ६.४५ वाजता पोहोचेल.
भुसावळ नागपूर- नाशिक रोड मेमू विशेष
क्र. ०१२१३ विशेष मेमू रेल्वे १२ रोजी भुसावळ येथून सकाळी ४.२५ वाजता सुटेल आणि नागपूर येथे त्याच दिवशी १२ वाजता पोहोचेल.
या गाडीला मलकापूर, नांदुरा, शेगाव, अकोला, मूर्तिजापूर, बडनेरा, चांदूर, धामणगाव, पुलगाव, वर्धा, सेवाग्राम, सिंदी आणि अजनी येथे थांबे असतील.
क्र. ०१२१४ विशेष मेमू रेल्वे १२ रोजी नागपूर येथून रात्री ११.४० वाजता सुटेल आणि नाशिकरोड येथे दुसऱ्या दिवशी दपारी २१० वाजता पोहोचेल
Discussion about this post