नंदुरबार । नंदूरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील धडगाव घाटात एका मालवाहतूक करणाऱ्या ट्रकचा मोठा अपघात झालाय. अंगणवाडीचा पोषण आहार घेऊन जाणारा ट्रक तब्बल १०० फूट खोल दरीत कोसळलाय.
धडगाव घाटात मालवाहक ट्रकचा भीषण अपघात, १०० फूट खोल दरीत कोसळला ट्रक( सागर निकवाडे साम ) pic.twitter.com/LTpeug04to
— bharat jadhav (@bharatjadhav891) May 2, 2025
अपघातात सुदैवानं कोणतीच जीवितहानी झाली नाही. पण लहान मुलांच्या पोषण आहाराचं मोठ नुकसान झालंय. मिळालेल्या माहितीनुसार, चालकाचा स्टेअरिंगवरील ताबा सुटल्यानं संरक्षण भिंत तोडून ट्रक थेट १०० फूट खोल दरीत कोसळला. या घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे.
Discussion about this post