मुंबई । देवेंद्र फडणवीस यांनी तिसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली असून ते राज्याचे २१ वे मुख्यमंत्री झालेत. त्यांच्याबरोबर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.
या सोहळ्याला देशभरातील विविध क्षेत्रातील दिग्गज व्यक्ती उपस्थित होते. स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह संपूर्ण केंद्रीय मंत्रिमंडळ, 22 राज्यांचे मुख्यमंत्री यांच्या उपस्थित हा सोहळा पार पडला. या कार्यक्रमाला सिनेक्षेत्रासह विविध क्षेत्रातील दिग्गजांनी हजेरी लावलेली होती. हा कार्यक्रम जितका भव्यदिव्य राहिला तितकाच तो सस्पेन्स वाढवणारा देखील राहिला. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह केंद्राच्या मंत्रिमंडळातील अनेक केंद्रीय मंत्री आधी मंचावर उपस्थित झाले. मं
महायुतीच्या शपथविधीविषयी मोठा ड्रामा पाहायला मिळाला. मुख्यमंत्रिपद आणि गृहमंत्रिपदावरून शिवसेना आणि भाजपमध्ये शीत युद्ध सुरू झालं होतं. तर मुख्यमंत्रिपद गेल्यामुळे आणि गृहमंत्रिपदही मिळत नसल्याने एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा होती. शिंदे नाराज असल्याने ते आज उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार नाहीत असंही म्हटलं जात होतं.
आज शिंदे यांच्या गटातील आमदार एकनाथ शिंदेंचे मन वळवण्यात यशस्वी झाल्यानंतर शिंदे उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार असल्याचं सांगितलं. शपथविधी सोहळ्याला एकनाथ शिंदे हे देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर मंचावर आले. देवेंद्र फडणवीस यांचा राजकीय प्रवास जाणून घेऊ. आरएसएसचे स्वयंसेवक, सर्वात तरुण महापौर, मॉडेल आमदार ते तिसऱ्यांदा मुख्यमंत्री अशी गरुडझेप फडणवीस यांनी घेतलीय. फडणवीसांचा मॉडेल ते रोल मॉडेल हा प्रवास थक्क करणारा आहे.
Discussion about this post