मुंबई । उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रालयातील कार्यालयाची तोडफोड करण्यात आल्याने खळबळ उडाली असून अज्ञात महिलेकडून ही तोडफोड करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर ऑफिस आहे. गुरुवारी सायंकाळी एका अज्ञात महिलेने या कार्यालयाची तोडफोड करण्याचा तसेच कार्यालयात घुसून गोंधळ घालण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकाराने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून उपमुख्यमंत्री कार्यालयाने यासंबंधी तक्रार दाखल केली आहे.
धक्कादायक बाब म्हणजे मंत्रालय परिसरात प्रवेश मिळवण्यासाठी पास लागतो. मात्र या महिलेने पास न काढता सचिव गेटद्वारे आतमध्ये प्रवेश केला. यावेळी सुरक्षेसाठी पुरुष पोलीस तैनात असल्याने संंबंधित महिलेला पकडू शकले नाहीत. या महिलेने कार्यालय परिसरातील कुंड्या फेकल्या तसेच आरडाओरडा करत गोंधळ घातल्याचे सांगण्यात येत आहे. सध्या या महिलेची ओळख पटवण्याचे काम सुरु असून कार्यालयाची तोडफोड का केली? याबाबतचा तपास सुरु आहे.
Discussion about this post