मुंबई । कंत्राटी भरती संदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत मोठा गौप्यस्फोट केला. आमच्या सरकारवर कंत्राटी भरतीचा आरोप होत असला तरी राज्यातील पहिली कंत्राटी भरती ही तत्कालीन कॉंग्रेस व राष्ट्रवादी सरकारने तर आताची भरती ही उध्दव ठाकरेंच्या काळात झाला असल्याचं ते म्हणाले. तसेच आज सरकार हा जीआर रद्द करत असल्याची महत्वाची घोषणा केली.
मुंबईत सात दहा हजार पोलीस कमी पडू शकतात. पोलीस सुरक्षा महामंडळ ट्रेनिंग दिलेले कॅन्डीडेट ३ हजार मुंबईत वापरले जातील. त्याचा पगार मुंबई पोलिस यातून केला जाणार. एकुणच तरूणाईत असंतोष करून अराजक परिस्थितीत करण्साचे काम केले जात आहे. 9 एजन्सी माध्यमातुन जे काम केले जाणार त्याबाबत जीआर रद्द केला जाईल, अशी घोषणा देवेंद्र फडणवीसांनी केली. इतर विभागात जनरल कंत्राट भरती सुरू राहील – ज्या एज्नसी माध्यातून भरती केली जाणार होती ती फक्त रद्द केली, असे ते म्हणाले.
पहिली कंत्राटी भरती शरद पवार यांच्या एनसीपीने शिक्षण विभागात पहिली कंत्राटी भरती सुरु करण्यात आली. 2010 साली अशोक चव्हाण यांनी पहिला जीआर काढला. यामध्ये वाहन चालक, तांत्रिक, लिपिक, शिपाई पदांचा जीआर काढण्यात आला. 1 सप्टेंबर 2021 ला उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना आरएफपीला सरकारची मान्यता मिळाली. मसूदा मंजुर झाला, निवदा निघाल्या. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंच्या सहीचा कागद दाखवत कंत्राटी भरतीला मान्यता मिळाल्याचा आरोप केला.हे संपूर्ण पाप कॉंग्रेसचं, उबाठा आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं आहे. आमच्याही काळात कंत्राटी लोकं घेतली आहे. पण आता विरोधक आंदोलन करत आहेत. त्यांना लाज, शरम वाटली पाहिजे, असे फडणवीस म्हणाले.
Discussion about this post