पुणे । राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडवीसांवर निशाणा साधत राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी गंभीर आरोप केलेत. देवेंद्र फडणवीस राज्याचे गृहमंत्री झाले की, राज्यातला क्राईम आणखी वाढतो. पुण्यात दिवसाढवळ्या खून होतात. दिवसाढवळ्या पुण्यात गाड्यांची तोडफोड होत आहे. हे गृहमंत्री आणि गृह खात्याचं सपशेल अपयश आहे. जेव्हा जेव्हा राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस असतात तेव्हा तेव्हा सगळ्यात जास्त क्राईम हा नागपुरात होतो, अशा शब्दांत सुप्रिया सुळेंनी फडणवीसांवर हल्लाबोल करत आरोप केला आहे.
माध्यमांशी संवाद साधताना यावेळी त्यांनी पुण्यातल्या कोयता गँगचा देखील उल्लेख केला. पुण्यात महिला मला भेटतात आणि म्हणतात आम्हाला कोयता गँगची फार भीती वाटते. आमचं सरकार असताना होती का कोयता गँग?, असा सवाल सुप्रिया सुळेंनी जनतेला विचारला आहे.
महाराष्ट्राचे गृहमंत्री ४५+ मध्ये व्यस्त आहेत. त्यांना अधिकार नक्की किती आहेत हे समजत नाही. देवेंद्र फडणवीस आता टिव्हीवर फार दिसत नाहीत. दादा दिसतात, मुख्यमंत्री तर रोजच दिसतात पण आधी सारखे देवेंद्र जी दिसत नाहीत. आमचं पटो न पटो आधी ५ वर्ष ते नेहमी मुख्यमंत्री म्हणून टिव्हीवर दिसत होते. आता दिसत नाहीत. कधीतरी नागपूर विमानतळावर दिसतात एक प्रश्न घेतात आणि नमस्कार करून निघून जातात, अशा शब्दांत सुप्रिया सुळेंनी फडणवीसांना कोपरखळ्या दिल्यात.















Discussion about this post