मुंबई । महाराष्ट्रातील सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री कोण असणार? याबाबतची उत्सुकता लोकांच्या मनात आहे. अशातच भाजपच्या विधिमंडळ गटनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड करण्यात आली आहे. नुकताच पार पडललेल्या भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे. गटनेते पदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला जाणार आहे. विधानसभेच्या सेंट्रल हॉलमध्ये भाजपच्या आमदारांची बैठक होणार आहे. सर्व आमदारांना फेटे बांधण्यात आले आहेत.
भाजपची कोअर कमिटीची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची निवड करण्यात आली. आता अधिकृत घोषणा करणे बाकी आहे. विधिमंडळामध्ये होणाऱ्या बैठकीसाठी भाजपचे सर्व आमदार उपस्थित आहे. या बैठकीमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचा प्रस्तावा मांडला जाणार आहे. सुधीर मुनगंटीवार आणि चंद्रकांत पाटील हे प्रस्ताव मांडतील. आशिष शेलार आणि रवींद्र चव्हाण प्रस्तावाला अनुमोदन देणार आहेत.
Discussion about this post