मुंबई । लोकसभा २०२४ च्या निवडणुकीची निकाल काल मंगळवारी जाहीर झाला असून यात भाजप प्रणित एनडीएला बहुमत मिळाले असले तरी महाराष्टात भाजपला मोठा फटका बसला आहे. महाराष्ट्र्रात भाजपला केवळ ९ जागांवर विजय मिळविता आला आहे. दरम्यान पराभवाची जबाबदारी स्वीकारत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक धक्कादायक निर्णय घेतला आहे.
निकालानंतर भाजपची आज बैठक पार पडली असून या बैठकीत पराभवासंदर्भात विचारमंथन करण्यात आले. त्यानंतर भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यांनी भाजपचा पराभव का झाला? त्याचे कारणे माध्यमांना सांगितली.
देवेंद्र फडणवीस यांनी भारतीय जनता पक्षाच्या पराभवाची कारणे सांगताना म्हटले की, मराठा आरक्षणाचा मुद्दा काही भागात महत्वाचा ठरला. आम्ही मराठा समाजाला आरक्षण दिले. त्यानंतरही हा मुद्दा मांडण्यात आला. तसेच विरोधकांकडून संविधान बदलणार असल्याचा प्रचार जोरात केला गेला. तो खोडून काढण्यात आम्ही अपयशी ठरलो.
आता लोकसभा निवडणुकीच्या पराभवाची जबाबदारी स्वीकारत राज्य मंत्रिमंडळातून बाहेर पडण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे. तसेच पराभवाची जबाबदारी स्वीकारत राज्य मंत्रिमंडळातून बाहेर पडण्याची इच्छा व्यक्त केली आहे. नेता म्हणून महाराष्ट्रातील भाजपच्या पराभवाची सर्व जबाबदारी माझी आहे. पण मी हरणारा नाही, पण ताकदीने मैदानात उतरणार आहे. परंतु नेतृत्वाला माझी विनंती आहे, मला मुख्यमंत्रीपदाच्या जबाबदारीतून मुक्त करावे आणि पक्षात काम करण्याची जबाबदारी द्यावी, असे धक्कादायक विधान देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना केले.















Discussion about this post