नाशिक । नाशिक महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष व मनसेच्या अनेक दिग्गज नेत्यांनी आज मंत्री गिरीश महाजन यांच्या नेतृत्वात भाजपात प्रवेश घेतला आहे. यातील काही जणाच्या पक्षप्रवेशाला भाजपच्या निवडणूक प्रमुख व आमदार देवयानी फरांदे यांचा विरोध होता. परंतु फरांदे यांचा विरोध झुगारुन मंत्री महाजन यांनी त्यांना पक्षात प्रवेश दिला
यांचा भाजपमध्ये प्रवेश?
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी महापौर विनायक पांडे, यतीन वाघ, कॉंग्रेसचे शाहू खैरे व मनसेचे दिनकर पाटील यांनी आपल्या समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश केला. यातील माजी महापौर विनायक पांडे, यतीन वाघ व कॉंग्रेसचे शाहू खैरे यांच्या पक्षप्रवेशाला देवयानी फरांदे व त्यांच्या समर्थकांनी विरोध केला. भाजप कार्यालयाबाहेर फरांदे समर्थकांनी मंत्री गिरीश महाजनांना घेराव घातला. महाजनांसमोर फरांदे समर्थकांनी घोषणाबाजी करत या प्रवेश सोहळ्याला विरोध दर्शवला.
परंतु महाजन यांनी आमदार देवयानी फरांदे व त्यांच्या समर्थकांचा विरोध झुगारुन या सर्वांना पक्षात अधिकृत प्रवेश दिला. त्यामुळे आमदार देवयानी फरांदे दुखावल्याचे पाहायला मिळाली.















Discussion about this post