छत्रपती संभाजीनगर : राज्यभरात सरकारी अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून घेतल्या जाणाऱ्या लाचेच्या बातम्या सातत्याने समोर येत असून अशातच छत्रपती संभाजीनगरमध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) मोठी कारवाई केली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये निवासी उपजिल्हाधिकारीला ५ लाख रुपयांची लाच घेताना एसीबीने रंगेहात ताब्यात घेतलं आहे. विनोद खिरोळकर असं लाचखोर उपजिल्हाधिकार्याचे नाव असून या कारवाईने मोठी खळबळ उडाली आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयातील निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर यांनी शेतजमिनीच्या वर्ग बदलासाठी तक्रारदाराकडून मोठ्या रकमेची मागणी केली होती. यापूर्वी २३ लाख रुपये घेतल्यानंतरही त्यांनी १८ लाखांची अतिरिक्त मागणी केली. यातील ५ लाख रुपये घेताना ACB ने सापळा रचून त्यांना आणि अव्वल कारकून त्रिभुवन यांना रंगेहात पकडले. या कारवाईमुळे जिल्ह्यातील प्रशासकीय यंत्रणेत खळबळ उडाली असून, पुढील तपास सुरू आहे.
Discussion about this post