जळगाव | जळगाव शहरातून एक धक्कादायक घटना समोर आलीय. शहरातील समता नगरात असलेल्या महापुरूषांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आल्याचा प्रकार आज सकाळी उघडकीस आला. यामुळे शहरात खळबळ उडाली असून या घटनेने या प्रकरणी दोषींवर कारवाई करण्यात यावी यासाठी समाजबांधव आक्रमक झाले आहेत.
शहरातील समता नगर भागात महापुरूषाचा पुतळा आहे. आज पहाटे या पुतळ्याची विटंबना करण्यात आल्याचे परिसरातील नागरिकांना दिसून आले. यामुळे काही क्षणातच येथे परिसरातील नागरिकांनी धाव घेत जोरदार घोषणाबाजी सुरू केली. या प्रकरणी दोषींवर कारवाई करण्यात यावी यासाठी समाजबांधव आक्रमक झाले आहेत.
दरम्यान, या प्रकाराची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. कोणताही अनुचीत प्रकार होऊ नये यासाठी येथे कडेकोट बंदोबस्त लावण्यात आला आहे. या संदर्भात कुणीही अफवांना थारा देऊ नका असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे. तर या प्रकरणी तपासाची चक्रे फिरवण्यात आली आहे.
Discussion about this post